औरंगाबाद लोकसभा मतदार संघात यंदा पहिल्यांदाच चौरंगी लढत झाली. चौरंगी लढतीमुळे निकाल काय लागेल हे सांगता येत नाही, अशी स्थिती होती. पण आज मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यावेळी पहिल्या फेरीपासूनच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील हे आघाडी घेऊन आहेत. शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात सातव्या फेरी अखेरपर्यंत काट्याची टक्कर दिसून येत होती. परंतु आठव्या फेरीअखेर खा. चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधवला पाठिमागे टाकत दुसर्या क्रमांकावर उडी घेतली. काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून मोठ्या पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आली मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीत सुरू असलेल्या मतमोजणीच्या ठिकाणी शिवसेना, एमआयएम, हर्षवर्धन जाधव काँग्रेसच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती प्रत्येक खेळीचे अपडेट येताच समर्थक एकच जल्लोष करत होते पहिल्या फेरीपासून जलील यांनी आघाडी घेतली पहिल्या पाच फेर्यात एमआयएमची आघाडी टिकून राहिली आहे दुसर्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव तर शिवसेनेचे खासदार खैरे तिसर्या क्रमांकावर फेकले गेले होते. परंतु आठव्या फेरीनंतर त्यांनी दुसर्या क्रमांकावर उडी घेतली. गंगापूर वैजापूर पूर्व तसेच मध्य मतदारसंघातइम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे आणि जाधव यांनी जवळजवळ सारखीच मते प्राप्त केल्याचे दिसते. काँग्रेसचे सुभाष झांबड पहिल्या फेरी पासूनच पिछाडीवर पडल्याचे दिसून आले एकंदरीत मतमोजणीच्या पहिल्या पाच फेरीत आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातच टक्कर दिसून आली एकूण 26 फेर्या होणार आहेत प्रत्येक फेरीला किमान तीस मिनिटांचा अवधी लागतो त्यानुसार निवडणुकीचा संपूर्ण निकाल हाती येण्यास उशीर होण्याची चिन्हे आहेत.